20 लाखांचे अमिष अन् 17 लाखांना गंडा; दोघांविरूद्ध गुन्हा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  कामाच्या निविदेच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल विठ्ठल चव्हाण व रमेश कोते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे.

दोमल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अतुल चव्हाण याने सन 2015-16 मध्ये श्री साईबाबा संस्था, या संस्थेच्या द्वारावती भक्तनिवास व शैक्षणिक इमारतीच्या रंगकामाच्या निविदा आपण एकत्रित भरू.

त्यातून प्रत्येकी 20 लाख रूपये मिळतील. निविदा भरल्यानंतर रमेश कोते बिल काढण्यासाठी मदत करणार आहेत, असे सांगितले.

चव्हाण यांच्यासोबत भागीदारी पत्र करून 9 सप्टेंबर 2015 ते 6 नोव्हेंबर 2015 दरम्यान वेळोवेळी चेकने 11 लाख व रोख स्वरूपात सहा लाख रूपये दिले.

चव्हाण याने ही रक्कम वापरली. निविदांची बिले काढून पैसे आज देतो, उद्या देतो, असे सांगून 17 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे दोमल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe