अँटी करप्शन ब्युरो विभागात पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले यांची नियुक्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- पोलीस निरीक्षक बजरंग विश्वनाथ चौगुले यांची नुकतीच अँटी करप्शन ब्युरो विभागात डिवायएसपी म्हणून पदोन्नती झाली आहे.

त्यामुळे त्यांचे पोलीस दलाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. बजरंग चौगुले हे अहमदनगर मध्ये शहर ट्रॅफिक मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते.

त्यांनी त्यांच्या काळामध्ये नगर शहरामध्ये बाहेरून येणारे अवजड वाहने पूर्णतः शहरांमध्ये येण्यास बंदी घातली होती व या अवजड वाहनांना पर्यायी व्यवस्था म्हणून बायपास रोड वरून वाहतूक व्यवस्था करून दिली होती.

यामुळे नगरकरांना ट्रॅफिक बाबतीत खूप मोठा दिलासा मिळाला होता.असा खमका अधिकारी आज अँटी करप्शन ब्युरो या विभागात डीवायएसपी म्हणून कार्यरत झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe