अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला.
त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शिंदे व त्याच्या पत्नी पुष्पा शिंदे दुचाकीवर नगर-पुणे रोडवरून जात असताना केडगाव येथील अंबिका बसस्थानकाजवळ स्पीड ब्रेकर असल्याने विजय यांनी दुचाकीचा वेग कमी केला.
याचा फायदा घेत पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी पुष्पा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र असे तीन तोळ्याचे दागिणे ओरबडून धूम ठोकली.
पुष्पा शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत.