अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरात उघडकीस आलेल्या बायोडिझेल प्रकरणाची सीआयडी चौकशी करून यातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.
अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बायोडिझेल प्रकरणातील सर्व आरोपी सरकारच्या महसुलाची फसवणूक करून शासनाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे.
पोलीस प्रशासनाचे कुठलेही या आरोपींना भय राहिलेले नाही,राजरोसपणे नगर शहरातील बायपास महामार्गावर अनाधिकृतपणे शेड उभारून बायोडिझेल विक्री करत होते.
बायोडिझेल विक्री करून त्यांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे तसेच नगर शहरासह जिल्ह्यामध्ये या बायोडिझेल विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांना हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. या सर्व आरोपींना राजकीय आश्रय आहे. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व सदर तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी शिवराष्ट्रसेनेचे संतोष नवसुपे यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले निवेदनाची दखल न घेतल्यास शिवराष्ट्र सेनेच्या वतीने येत्या सात दिवसांमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम