अहमदनगर :- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षा पासून कार्यरत असलेल्या श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर ची सन 2019-2021 या तीन वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नुकतीच प्रतिष्ठान च्या सदस्यांची बैठक पार पडली. त्या मध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्या संदर्भात प्रस्ताव मांडला गेला. त्यामध्ये खालील प्रमाणे सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली.

अध्यक्ष- अँड. शिवाजी अण्णा कराळे पाटील, उपाध्यक्ष- रमेश राठोड, कार्याध्यक्ष- रामदास मुळीक, सचिव – सचिन ठाणगे, कोषाध्यक्ष- कुशल घुले, सदस्य- विजयकुमार आमटे, कांतीलाल गर्जे , बापुसाहेब फसले, महादेव आमले, बाळासाहेब शिरसाट, विनायक तळेकर, बाळासाहेब पुंडे , भास्कर पालवे, उत्तम शिंदे .
श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर चे माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजात उत्तम काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, कलावंत इ. सन्माननीय व्यक्तीचा शिवशंभो रत्न पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करण्यात येतो.