अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- बहिण-भावाला सत्तुर, दगड, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असल्याची घटना भिंगारमधील संभाजीनगर परिसरात घडली.
या मारहाणीत शरद बन्सी पाथरे (वय 43) व त्यांची बहिण सुनीता नितीन पाटोळे (वय 40 रा. माधवबाग, भिंगार) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजी दुकान लावण्याचे कारणावरून हा वाद झाला आहे. जखमी शरद पाथरे यांनी भिंगार पोलिसांना रूग्णालयात दिलेल्या जबाबावरून बन्सी साधू पाथरे, सचिन बन्सी पाथरे, संदीप बन्सी पाथरे, मिरा सचिन पाथरे, जेसंता संदीप पाथरे, माया ऊर्फ साकाबाई बन्सी पाथरे (सर्व रा. माधवबाग, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शरद पाथरे यांच्या संभाजीनगर येथील मालकीच्या गाळ्यासमोर आरोपी जमले. त्यांनी दुकानासमोर भाजी दुकान लावण्याचे कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करण्यास सुरूवात केली.
तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले, ही जागा माझी आहे. याचा राग येवुन बन्सी पाथरे याने त्याच्याकडील सत्तुरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांची बहिण सुनीता पाटोळे यांना दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक आर. आर. द्वारके करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम