१७ लाखांची फसवणूक ! त्या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  कामाची निविदा काढण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, फिर्यादीत म्हटले आहे की,

अतुल चव्हाण याने सन २०१५-१६ मध्ये श्री साईबाबा संस्था, या संस्थेच्या द्वारावती भक्तनिवास व शैक्षणिक इमारतीच्या रंगकामाच्या निविदा एकत्रित भरू.

त्यातून प्रत्येकी २० लाख रुपये मिळतील, असे सांगितले. निविदा भरल्यानंतर रमेश कोते बिल काढण्यासाठी मदत करतील, असेही सांगितले.

चव्हाण यांच्यासोबत भागीदारीत ९ सप्टेंबर २०१५ ते ६ नोव्हेंबर २०१५ दरम्यान वेळोवेळी चेकने ११ लाख व रोख स्वरूपात ६ लाख रूपये दिले.

चव्हाणने ही रक्कम वापरली. पैसे आज देतो, उद्या देतो, असे सांगून १७ लाख रूपयांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.