अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता.
भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा व भिंगार पोलीस ठाण्यात एक असे सात गुन्हे दाखल आहेत.
बुरूडगाव (ता. नगर) येथील नंदु बाबासाहेब शिंदे यांची विहीरीवरील केबल कापून कोणीतरी चोरी केल्याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस अंमलदार दिलीप झरेकर, भानुदास खेडकर, राहुल द्वारके, अरूण मोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम