अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या घटत असताना आता साथीच्या आजाराने डाेकेवर काढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चिकनगुनिया सदृश्य आजारांच्या रुग्णांत वाढ हाेत आहे.
आराेग्य विभागाने मात्र अशा प्रकारचे रुग्ण आढळून येत असले तरी ते तुरळक असल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून काेराेना रुग्ण संख्या घटत आहे.

शनिवारी जिल्ह्यात १०९ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ६२७ आहे. महापालिका क्षेत्रात १४ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकीकडे काेराेना रुग्ण संख्या कमी झाली असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र ताप, चिकनगुनिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम