गोवंशीय जनावरांची मांस विक्री करणाऱ्या दुकानावर झेंडीगेट परिसरामध्ये कोतवाली पोलिसांचा छापा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात गोमांस विक्री करण्यावर बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून आठ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली .

ही कारवाई झेंडीगेट परिसरात केली. याबाबतची माहिती अशी की , पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात कादरी मशीदजवळ पत्र्याच्या टपरीमध्ये एक व्यक्ती गोवंशीय मासांची विक्री करत आहे .

माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या आदेशावरून पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला व मांस विक्री करणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता,

त्याने त्याचे नाव सय्यद जाहीद रऊफ ( वय २१ वर्षे , रा . घासगल्ली कोठला नगर ) असे सांगितले.

घटनास्थळाहून ८ हजार ६२० रुपये किमतीचे मास व साहीत्य आणि आरोपी यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe