आंबेडकरवादी चळवळीतील ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- गेल्या चार-पाच दशकां पासून जिल्ह्याच्या बहुजन, आंबेडकरी वादी चळवळीतील एक प्रमुख नेते, आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने समर्थक कार्यकर्त्यांत खळबळ आणि संताप व्यक्त होत आहे.(ahmednaagr news)

अशोक गायकवाड हे आज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन घरी आले असता त्यांना पोस्टाने एक पत्र आले होते.

पत्रात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत अश्लाघ्य शब्दात मजकूर लिहण्यात आलेला आहे.

सदर पत्रात एका व्यक्तीचे नाव पत्र पाठवणारा म्हणून असले तरी गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने आपला या पत्राशी संबंध नसल्याचे सांगितले आहे.

हा खोडसाळपणा अथवा गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान अथवा पक्षीय राजकारण यातून कोणी केला हे पोलिसांकडे तक्रार देऊन तपासले जाईल असे गायकवाड यांनी सांगितले. याबाबत ते पोलिसांत तक्रार देणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe