अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- बुधवारी रात्री नगर एमआयडीसी मधील सन फार्मा कंपनीमध्ये आग लागून एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता या घटनेनंतर आज राज्याचे कामगारराज्य मंत्री बच्चू कडू यांनी सन फार्मा कंपनी मध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत.
तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी आग प्रतिबंध करण्यासाठी जेवढ्या यंत्रणा आहेत त्या बसवण्याचा उपाययोजना कराव्यात.
या आगीतील घटने मध्ये कंपनीचे कर्मचारी रावसाहेब मघाडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांना दिले आहेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करून तातडीने गुन्हे दाखल करावेत असेही त्यांनी सांगितले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम