चुम्मा दे गाण्यावर राष्ट्रवादी ‘नाचते’तर मुन्नी बदनाम हुई हे गाणे शिवसेनेला ‘आवडते’: भुतारे

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सूरु झाले. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेय वाद पाहायला मिळत असताना अश्वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी दोन दिवसांपूर्वी नगर शहरात झाली होती. परंतू लोकार्पण सोहळा करतांना कुठेही शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात आलेला नसून

जुन्याच पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली व जनतेची स्वतहाच्या स्वार्थासाठी दिशाभूल करण्याचा प्रकार हा नगर शहरांतील राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे.

महापौरांनी या सोहळ्याला निधी दिला शिवसेनेला हे सर्व माहीत असताना दोन दिवस अगोदरच हा सर्व प्रकार जाहिर करणे गरजेच होते. फक्त चित्रपटाच्या गाण्यावर चम्मा दे गाण्यावर नाचाण्यासाठी जनतेचा पैसा असा वाया जात असेल तर शिवाजी महाराज अश्या लोकांना माफ करणार नाहित.

महाराजांचा वापर फक्त नाच गाण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते चूम्मा दे गाण्यावर नृत्य करतात तर शिवजयंती मिरवणुकीत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर नाचतात

त्यामुळें कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहित फक्त स्वतःचा प्रसिध्दी साठी महाराजांचा पुतळा समोर ठेवायचा आणि आणि अशील गाण्यांवर नृत्य करायचे ही सवयच राष्ट्रवादी शिवसेना या दोन्ही पक्षाला आहे.

त्यामुळे या पुढे महाराजांच्या नावाखाली तमाशे भरविण्याचे प्रकार कोणीही करू नये. झालेल्या सर्व प्रकाराबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आमच्या सह सर्वांनी या पुढे महाराजांसमोर चित्रपटांतील गाणी वाजविणार नाही अशी शपथ घेण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार असुन खरंच जर राष्ट्रवादी शिवसेना पक्षयील पदाधिकारी यांना महाराजांबद्दल हिंदुत्वा बद्दल आत्मियता, प्रेम असेल तर त्यांनी सुध्दा येऊन अशी शपथ घ्यावी असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe