अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- दोन दिवसांपूर्वी वाद झाला तो मिटला होता. मात्र याच कारणातून पुन्हा वाद झाला आणि एकास तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली.
आप्पा भिमा जाधव (वय 40 रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास श्रीराम चौकात सागर हॉटेलच्या पाठीमागे ही घटना घडली. अश्रु बापु माने, सुरेखा बापु माने, चंद्रीका संतोष जाधव यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी फिर्यादी आप्पा जाधव यांचा पुतण्या सुरज रमेश जाधव यांचा व अश्रु माने यांच्यात वाद झाले होते. हा वाद फिर्यादी यांनी मिटविला होता.
गुरूवारी सायंकाळी अश्रु माने याने फिर्यादी यांना श्रीराम चौकातील सागर हॉटेलच्या पाठीमागे बोलवून घेतले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अश्रु माने याने लोखंडी पाईपने फिर्यादी यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम