सहा हजार किलो गोमांससह 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी अरणगाव परिसरात पकडला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन जाणार्‍या टेम्पोला आरणगाव-जामखेड रोडवर पकडले.

या टेम्पोमध्ये नऊ लाख रुपये किमतीचे सहा हजार किलो गोमांस व टेम्पो असा 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक नदिम आयूब मन्यार (वय 39 रा. संगमनेर), मुजफ्फर आयुब शेख (वय 31 रा. खडकत ता. आष्टी जि. बीड), रईस जब्बार शेख (रा. खडकत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर नदिम व मुजफ्फरला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरणगाव-जामखेड रोडने जामखेडच्या दिशेने रईस शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले मांस विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस पथकाने आरणगाव-जामखेड रोडवरील आरणगाव चौक येथे पथकाने सापळा रचून टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पोमध्ये गोमांस मिळून आले. पोलिसांच्या पथकाने पंचासमक्ष टेम्पोचा पंचनामा करून टेम्पो, गोमांस ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe