अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.(Ahmednagar news)
यामुळे प्रवाशी देखील त्रस्त झाले आहे. आता या खासगी वाहनधारकांचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्याला आला. महापालिकेचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे रा. आनंदनगर ता. मालेगाव जि. नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

दाखल फिर्यादीवरून सेवा ट्रॅव्हल्स्चे एजंट अमीर फारूख खान (रा. जुना बाजार, नगर), सोफियान बागवान (रा. पंचपीर चावडी), समशेर सलीम खान (रा. जुना बाजार, पंचपीर चावडी व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुल आहिरे हे नगरहून जळगाव येथे जाण्यासाठी माळीवाडा परिसरातील सेवा ट्रॅव्हल कार्यालयासमोर गेले.
ते तेथे उभ्या असलेल्या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसले. यावेळी चार इसमांनी त्यांना खाली उतरवले. चारशे रूपये तिकीट पडेल, असे सुनावले.
मात्र, आहिरे यांनी 250 रूपये तिकीट असल्याने मी तेवढेच पैसे देणार, असे म्हणाले असता त्या चार इसमांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम