पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धेत सारडा महाविद्यालयाची ‘सहल’ एकांकिका द्वितीय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धेत नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने दुसर्‍यांदा झेंडा फडकविला आहे.

नुकत्याच झालेल्या स्पर्धेचा रविवारी सायंकाळी निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘सहल’ एकांकिकेस सांघिक द्वितीय पारितोषिक व हरि विनायक करंडक व वैयक्तिक चार पारितोषिके मिळवली.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी कलाकार विद्यार्थ्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाच्या ‘सहल’ एकांकिकीने सांघिक द्वितीय क्रमांकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अविष्कार ठाकूर, सर्वोत्कृष्ट अभिनय गौरी डांगे,

अभिनय उत्तेजनार्थ निरंजय केसकर व श्रृता भाटे यांनी वैयक्तिक पारितोषिके मिळविली. ब्रिजलाल सारडा म्हणाले, नगरच्या नाट्य क्षेत्राला मोठी ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत गेल्या 3-4 वर्षांपासून नगरच्या संघांना प्रवेश देण्यास सुरुवात केल्यानंतर पेमराज सारडा महाविद्यालयाने या स्पर्धेत प्रत्येकवर्षी आपले झेंडा फडकावित यश संपादन करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!