अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठा सत्याग्रह केला होता.
या आंदोलनाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महापालिकेमध्ये या संघर्ष समिती व महापालिकेची संयुक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये पुतळयाच्या जागेची मोजणी करून घेऊ व आर्किटेक नेमून डिझाईन तयार करून ती डिझाइन पालिकेत उपलब्ध करण्यात येईल.
तसेच ३ मार्चला न्यायालयीन प्रक्रियेची सुनावणी झाल्यावर माहिती घेणार असल्याचे बैठकीत सांगितले आहे.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या वतीने हा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही, तर अहमदनगर शहर बंदची हाक समितीच्या वतीने देण्यात आली.