अपघातप्रकरणी वाहन चालकास न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अपघाताच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला दोषी धरून एक वर्ष कारावास व मयताच्या वारसास 30 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, अशी शिक्षा ठोठावली आहे.

शफिक वसीर सय्यद (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती शबनम शेख यांनी हा निकाल दिला.

अपघातप्रकरणी आरोपी शफिक सय्यद याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 304 (अ), 279, 134 (अ), (ब), 187 अन्वये गुन्हा दाखल होता. आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती शबनम शेख यांच्यासमोर झाली.

आरोपी सय्यद याला न्यायालयाने दोषी धरून भादंवि कलम 279 अन्वये एक महिना कारावास व 500 रूपये दंड, भादंवि कलम 304 (अ) अन्वये एक वर्ष कारावास व एक हजार रूपये दंड,

भादंवि कलम 134 (अ) व (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम 187 अन्वये एक महिना कारावास व 250 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच मयताच्या वारसास 30 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ए. सी. आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस अंमलदार पूजा दिखत व सुनीता आव्हाड यांनी मदत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe