तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍याच्या मुसक्या आवळ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्‍या सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली.

त्यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीची ओळख पटली असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर शहरात राहणार्‍या रिक्षा चालकाला तिघांनी मारहाण करत त्याला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्याचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितल्याची घटना नगर शहरात घडली होती.

याप्रकरणी गुरूवारी रात्री तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, जबरी चोरी, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी निरीक्षक मुजावर यांनी गुन्ह्यातील आरोपी सय्यद अझर नवाजुद्दीन, शेख अरबाज हारून यांना ताब्यात घेत अटक केली.

त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यातील एक अनोळखी इसमाचे नावही समोर आले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे निरीक्षक मुजावर यांंनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe