…तर शिवसेना इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू देणार नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- एक धार्मिक कार्यक्रमाला विरोध करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे.

हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनने पत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भिंगार येथे मुंडे परिवाराच्या घरी हनुमान चालीसा पाठ सुरु होता. काही समाजकंटकांनी दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने धुडगूस घातला.

सोहेल शेख आणि त्यांच्या तीन ते चार साथीदार मुंडे यांच्या घरात घुसले व त्यांना मारहाण केली. स्पीकर फोडून टाकला. या घटनेची माहिती मिळताच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

विचारपूस करून मुंडे परिवाराला व परिसरातील रहिवाशांना धीर दिला. दरम्यान परिसरात जाणीवपूर्वक अशांतता पसरवून दहशत निर्माण करणार्‍याची गय केली जाणार नाही

असे प्रकार पोलिसांनी न थांबविल्यास व संबंधितांवर त्वरित कारवाई न केल्यास कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यास त्यावेळी शिवसेना जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News