घरफोडी करून चोरट्यांनी दागिणे चोरले; पोलिसांनी तपासकरून ते परत मिळविले

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरफोडी करून चोरून नेलेले साडेदहा तोळे सोन्याच्या दागिण्यापैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रूपये किंमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे.

कोतवाली पोलिसांनी केेलेल्या तपासामुळे फिर्यादीला हे दागिणे परत मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिणे चोरून नेले होते.

याप्रकरणी लालबागे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांनी करून घरफोडी करणारे आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा),

गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. देवळाली चौक, सातारा परिसर, औरंगाबाद मुळ रा. शिरसवाडी ता. जि. जालना) यांचा शोध घेवुन त्यांना अटक केली.

त्यांनी गुन्ह्याची कबूली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिणे जप्त केले. न्यायालयाच्या परवानगीनंतर ते फिर्यादी लालबागे यांना देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe