वन विभागाचे दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- लाकडाच्या वाहतूकीस परवानगी देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वन विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील दोघेजण अटक केली आहे.

सहायक वनसंरक्षक सुनील रतन पाटील आणि वन परिक्षेत्राधिकारी सुनील अच्युतराव थेटे अशी त्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अहमदनगरमध्ये गुरूवारी रात्री केली.

यातील तक्रारदाराचे वाहन लाकूड वाहतूक करत असतात वन विभागाने कारवाई करत पकडले हाेते. मात्र ते कारवाई न करता सोडून दिले. यासाठी तक्रारदाराकडून या दाेघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली.

त्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना नाशिकच्या पथकाने गुरुवारी पकडले.

लाचलुचपत नाशिक परिक्षेत्राचे पाेलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे पाेलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील,

पोलीस नाईक प्रकाश महाजन, बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News