अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नातवाला दुचाकीवरून घरी घेऊन जाणार्या आजोबांना वाहनाची धडक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश भाऊसाहेब पवळ (वय 75 रा. आदर्श कॉलनी, नालेगाव, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
त्यांच्या मुलीचा मुलगा शिवांश (वय 3) हा जखमी झाला आहे. अहमदनगर – कल्याण महामार्गावर शिवाजीनगर उपनगरातील मोहटादेवी मंदिराजवळ हा अपघात झाला.
पवळ हे मुलीचा मुलगा शिवांश (वय 3) यास घरी घेऊन आले होते. शिवांश याला त्याच्या घरी सोडण्यासाठी ते दुचाकीवरून जात होते.
कल्याण महामार्गावरील मोहटा देवी मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला धडक देऊन वाहन चालक पळून गेला. या अपघातात प्रकाश पवळ यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.
त्यांचा नातू शिवांश हा जखमी झाला. सुवर्णा रावसाहेब गुंड (वय 46 रा. साई प्रसाद अपार्टमेंट, शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अप्पासाहेब तरटे पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम