झेडपीचा सर्वाधिक निधी आरोग्य -ज्ञान मंदिरांसाठीच दिला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामन्यांना उपचारासाठी मोठा खर्च तसेच त्रास सहन करावा लागला, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला.

कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक असताना शासकीय व खासगी डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचविले,ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचा सर्वाधिक निधी हा भविष्याच्या दृष्टीने आरोग्य मंदिरे व ज्ञान मंदिरांसाठी खर्च करण्यात आला असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राथमिक शाळांना चांगल्या वर्ग खोल्या नसल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या, ही बाब लक्षात घेऊन शाळा खोल्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात प्राधान्यक्रम दिला आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे आज उच्च दर्जाचे असून, विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमचे चांगले शिक्षण मिळावे, बसण्यासाठी चांगले वर्ग आसावेत, विद्यार्थांचे मन रममान व्हावे, यासाठी सर्वस्वी प्रयत्न करण्यात आले असून,

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री यांच्याकडे वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला व तालुक्यासाठी आणता आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe