Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रुपये लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर येथील एटीएम फोडीची घटना ताजी असतानाच आज (रविवार) पहाटे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रूपयांची रक्कम लंपास केली.(Ahmednagar Crime)

या दोन्ही ठिकाणचे एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस कटर टोळीने हे दोन्ही एटीएम फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर- पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) गावच्या शिवारात टाटा इंन्डीकॅश कंपनीचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडले.

या एटीएममधून तीन लाख सहा हजार 900 रूपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाटा इंन्डीकॅश एटीएमचे अधिकारी विजय केशव थेटे (रा. कोल्हार बु. ता. राहता) यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील,

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.

एटीएम फोडीची दुसरी घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली. नगर- मनमाड रोडच्या कडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले.

या एटीएममधून एक लाख ६४ हजारांची रोकड लंपास केली आहे. एटीएम फोडण्यासाठी येथेही चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला.

एटीएम फोडण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलरचा स्प्रे मारला, तसेच रॅकॉडींग केलेली हॉर्ड डीस्कही घेवुन पोबरा केला. गावात प्रथमच भर चौकात झालेल्या या धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यानी घटनास्थळी भेट देवुन अधिक तपास सुरू केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात एटीएम फोडीच्या वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. स्थानिकपोलिसांसह एलसीबीच्या पोलिसांनाही या टोळ्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe