Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे व या भरती प्रक्रिये बाबत विरोधकांकडून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. बँकेची ही भरती प्रक्रिया ज्या कंपनीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे त्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर खासदार निलेश लंके यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते.
त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची भरती वादात सापडल्याचे सध्या स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील सहकार सभागृहामध्ये श्री ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा कार्यक्रमानंतर मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला व त्यावेळी त्यांनी म्हटले की,जिल्हा सहकारी बँक भरतीच्या संदर्भात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात असून यामध्ये कुठल्याही प्रकारची तथ्य नाही.
जेव्हा बँकेवर आपल्या विचारांचे संचालक नसले की अशा प्रकारे बँकेची बदनामी करण्याचे हे षडयंत्र विरोधकांकडून केले जाते.अशा प्रकारची टीका त्यांनी विरोधी पक्षांवर केली.
अहमदनगर जिल्हा बँकेवर आपल्या विचारांचे संचालक नसले की बँकेची बदनामी करण्याचे षडयंत्र- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका
जिल्हा सहकारी बँक भरतीबाबत विरोधकांकडून वावड्या उठविल्या जात आहेत. परंतु त्यामध्ये तथ्य नाही, राजकारणात आपल्या विचारांचे संचालक नसले की अशा प्रकारे बँकेची बदनामी करण्याचे षडयंत्र केले जाते, अशी टीका महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षांवर केली.ते शनिवारी शहरातील सहकार सभागृहात श्री ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल लंघे, माजी आमदार पांडूरंग अभंग आदी उपस्थित होते. ते म्हणाले, अशा प्रकारची टीका बँकेला नवीन नाही.
मी अध्यक्ष असताना देखील अशीच टीका झाली होती. सत्ता तुमच्या ताब्यात असली की बैंक उत्तम चालते. दुसऱ्यांच्या ताब्यात बैंक गेली की घोटाळा झाला? याला काही अर्थ नाही. बैंक सक्षम आहे.शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षे कार्यरत आहे.
शेतकऱ्यांमध्ये बँकेबद्दल विश्वास आहे, असे ते म्हणाले. धार्मिक स्थळापासून मद्याचे व मांसाहाराची दुकाने लांब असावीत तसेच परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी कार्यक्रमातील एका वारकऱ्याने केली.
त्यावर विखे म्हणाले, यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न राज्य सरकार करील. तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमणेही काढली
जिल्हा नामांतराची प्रक्रिया
अहमदनगर शहराचे नामांतरण झाले, तालुका व जिल्ह्याच्या नामांतराला किती वेळ लागणार? याबाबत विचारले असता वित्ये- पाटील म्हणाले, तालुका व जिल्हा नामांतराचे राजपत्र लवकरच निघेल, नामांतराची एक प्रक्रिया असते. महसूल विभागाच्या संहितेनुसार कार्यक्रम प्रसिद्ध केला जाईल. त्यावर हरकती मागवल्या जातात. त्यानंतर अवलोकन करून नामांतर पूर्ण होईल.