Ahmednagar Hospital Fire : कोरोनावर उपचार घेण्यासाठी आले आणि आगीत होरपळून मरावं लागलं…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Hospital Fire :-  आज सकाळी च जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आग लागली.

या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ६० ते ७० वयोगटातील आहेत.

आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर कॅरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले.

त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या 20 जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.

हे सर्व रुग्ण कोरोनावावर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते मात्र दुर्दैवाने त्यांना सिव्हिलमध्ये लागलेल्या या आगीत होरपळून मरावं लागलं.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe