अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात फायर ऑडीटचे काम पुर्ण केले नसल्याने अकरा जणांना जीव गमवावा लागला. जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेले
सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना शेवटी रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणामुळे यमसदनी धाडल्याचे खळबळ जनक घटना जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली.
या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला असताना उपचारासाठी सर्वसामान्यांना जिल्हा रुग्णालयात पाय ठेवताना मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. कोट्यावधी रुपये खर्च करुन यंत्रणा उभी करत असताना मनुष्याचा जीवाला किंमत नसल्यासारखे आरोग्य यंत्रणा वागत आहे.
जानेवारी महिन्यात नवीन वर्षात भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा आगीने होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये देखील फायर ऑडीट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
ही घटना सर्वांना धडा देणारी होती. मात्र आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने याची पुनरावृत्ती अहमदनगर मध्ये झाली. फरक एवढाच जिल्हा रुग्णालयात फायर ऑडीट झाले. मात्र त्या ऑडीटची गांभीर्याने दखल घेऊन त्या त्रूटी दूर करण्यात आल्या नाहीत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम