ahmednagar kanda bajar bhav : कांदा 3100 पर्यंत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारच्या तुलनेत काल कांद्याच्या आवकेत 19 हजार गोण्या घट झाली तर जास्तीत जास्त भावात 100 रुपयांनी वाढ झाली.

काल 41 हजार 372 गोण्या (22 हजार 709 क्विंटल) आवक झाली तर भाव 3100 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 3000 ते 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मोठ्या कलर पत्ती कांद्याला 2200 ते 2800 रुपये, मिडीयम सुपर कांद्याला 1800 ते 2000 रुपये, गोल्टा कांद्याला 2200 ते 2300 रुपये,

गोल्टी कांद्याला 1500 ते 1700 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये तर सरासरी भाव 2000 ते 2500 रुपयांपर्यंत निघाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe