अपघातात अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी जखमी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  रस्ता ओलांडणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यास दुचाकीची धडक बसली. या धडकेत ते जखमी झाले आहेत. मिठू सोपान चौधरी (वय 58 रा. महापालिका प्रशासकीय इमारत) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.(Ahmednagar Accident) 

अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर महापालिका कार्यालयासमोर हा अपघात झाला. चौधरी हे महापालिका कार्यालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. औरंगाबादच्या दिशेने आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेला. चौधरी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक साठे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe