दिंड्यांना २० हजार अनुदान ! अहमदनगरमधील किती दिंड्यांना मिळणार पैसे? पहाच…

शासनाने नुकतेच आर्थिक बजेटमध्ये विविध घोषणा केल्या. लाडकी बहीण, कृषी वीजबिल माफ आदींसह दिंड्यांनाही अनुदान घोषित केले होते. याअंतर्गत २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

palkhi

Ahmednagar News : शासनाने नुकतेच आर्थिक बजेटमध्ये विविध घोषणा केल्या. लाडकी बहीण, कृषी वीजबिल माफ आदींसह दिंड्यांनाही अनुदान घोषित केले होते. याअंतर्गत २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्यातून पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबत जाणाऱ्या दिंड्यांनाच २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार जिल्ह्यातील फक्त ४४ ते ४५ दिंड्यांनाच हे अनुदान मिळणार आहे.

नाशिक येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, पैठण येथील श्री एकनाथ महाराज पालखी सोहळा व पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय पालखी सोहळा या तीन मानाच्या दिंड्या आहेत. त्या सोहळ्यांत १५४ दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत नगर जिल्ह्यातील ६, श्री संत एकनाथ महाराज पालखी दिंडीत शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील एकमेव दिंडी, तसेच श्री संत निळोबाराय पालखी दिंडीत ३७ दिंड्या सहभागी आहेत. या दिंड्यांना शासनाचे अनुदान उपलब्ध होणार आहे.

शासनाने पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर देवस्थानसह राज्यातील दहा मानाच्या दिंड्यांत सहभागी होणाऱ्या दिंड्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील फक्त दीड हजार दिंड्यांना होणार आहे.

त्यांच्यासाटी शासनाला फक्त ३ कोटींचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. हे अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe