Ahmednagar News : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली होती. आता मान्सूनने दमदार आगमन केले आहे. दक्षिणेतील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. जिल्ह्यात रविवारी ४२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
श्रीगोंद्यात गेल्या आठवडाभरात तालुक्यात १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शेवगाव तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात १४९ मिलिमीटर पाऊस झाला. संगमनेर तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे.
शनिवार, रविवार या दोन दिवसांत ३८.९ मिलिमीटर, तर रविवारी १३.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नगर तालुक्यात रविवारी (दि. ९ जून) ३९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आता आपण या ठिकाणी विविध ठिकाणचा पाऊस आकडेवारी नुसार समजून घेऊ –
४० महसूल मंडळांत ४० मिलिमीटर तर सहा मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त..
४० महसूल मंडळांत ४० मिलिमीटरपेक्षा अधिक तर सहा महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रविवारी (दि. ९ जून) नगर तालुक्यात ३९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक भिंगार महसूल मंडळात ६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर पारनेर तालुक्यात ६३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यामध्ये पारनेर महसूल मंडळ १०५.५ मिलिमीटर, वाडेगव्हाण महसूल मंडळात १०७.३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात सरासरी ५५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कोळगाव महसूल मंडळात ११२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. कर्जत तालुक्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक राशिन महसूल मंडळात ८८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जामखेड तालुक्यात २६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यामध्ये आरणगाव महसूल मंडळात ३९.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शेवगावमध्ये ४२.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात शेवगाव महसूल मंडळमध्ये ७४ मिलिमीटर, तर ढोरजळगाव महसूल मंडळात ६९ मिलिमीटर पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यात ७७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
यामध्ये सर्वाधिक करंजी-११२.८ मिलिमीटर, कोरडगाव – ११०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नेवासा तालुक्यात ५५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक १००.३ मिलिमीटर सलबतपूर महसूल मंडळात झाली. राहुरी तालुक्यात ३६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक सात्रळ महसूल मंडळात सर्वाधिक ४८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर तालुक्यात ४५.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये बेलापूर महसूल मंडळात ६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर राहाता तालुक्यात ३९.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांत समाधान
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगला जोर धरला आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. मागील आठ दिवसांत पाच दिवस पाऊस झाला आहे, तर पुढील चार दिवसांत आणखी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह बाजारपेठेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
काही ठिकाणी नुकसान
मागील दोन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरीही आज ढगाळ वातावरण असताना सुद्धा हलक्या सरी सोडल्या, तर मोठा पाऊस झाला नाही. औरंगपूर येथील शेतकरी रामनाथ किलबिले यांची म्हैस वीज पडून मृत झाली, तर शेकटे येथील दोन घरांचे पत्रे उडून गेल, तर एका घराची भिंत कोसळली आहे.