Ahmednagar News : ७० ठिकाणी शोध, १५२ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, अन ३ सेकंदांच्या फुटेजवरून चोर ताब्यात, फिरोदियांच्या घरावर दरोडा टाकणारा लाखोंच्या दागिन्यांसह अटकेत

Published on -

पोलिसांनी ठरवलं तर तर ते सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. याची प्रचिती नगर शहरात आली. पोलिसांनी डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल केली असून यासाठी त्यांनी सातत्याने २५ दिवस ७० ठिकाणचे तब्बल १५२ सीसीटीव्ही फुटेज तपासले.

अवघ्या ३ सेकंदांच्या फुटेजवरून त्यांनी चोरास जेरबंद केले. त्याच्याकडून ५५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व हिरे, मोत्याचे दागिने, असा ८२.८ तोळे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला. यासाठी पोलिसांनी सलग २५ दिवस नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी येथे तपास केला होता. दीपक सर्जेराव पवार (क्य ३२, रा. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.

डॉ. फिरोदिया यांच्या घरी २३ ते २८ ऑक्टोबरदरम्यान चोरी झाली होती. चोरट्याने ८२.८ तोळे सोने चोरून नेले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. त्यांनी विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्यात त्यांना फिरोदिया यांच्या घराजवळील एका शोरुमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन सेकंदाची क्लिप मिळाली. यात चोरटा पळून जाताना दिसत होता. त्या आधारे बसस्थानक, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी चोराचा माग काढला.

त्यानंतर राहुरी बसस्थानक परिसरात आरोपी पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर चोरी केलेले सोने आरोपीच्या घरून व काही त्याने सराफानं विकले होते ते त्यांच्याकडून जप्त केले.

कुत्रा विकत घ्यायला आला व अडकला :-
कोतवाली पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासलले होते. राहुरी येथील काहींना त्याचे फुटेज दिलेले होते. याच दरम्यान दीपक पवार हा कुत्रा विकत घेण्यासाठी आला. तेव्हा एकाने त्याला ओळखले व पोलिसांना कळवले. पोलिसांनी तेथे धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

कोतवालीच्या ‘या’ पथकाने होतेय कौतुक
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे,

संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, लोणी पोलिस स्टेशनचे रविंद्र मेढे, राहुल गुंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षकांनी या टीमला ३५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News