नगर-सोलापूर रोडवर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात, एक ठार

जामखेडहून पुणे येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या झालेल्या अपघातात जामखेड येथील दिपक विलास पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील दिपक विलास पवार (वय ३९, हल्ली रा. खडकी, पुणे), हा पुणे येथील येथे आपल्या कुटुंबासमवेत नोकरीनिमित्त रहात होता.

Pragati
Published:
Ahmednagar Accident News

Ahmednagar News :  जामखेडहून पुणे येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या झालेल्या अपघातात जामखेड येथील दिपक विलास पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सदरचा अपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील दिपक विलास पवार (वय ३९, हल्ली रा. खडकी, पुणे), हा पुणे येथील येथे आपल्या कुटुंबासमवेत नोकरीनिमित्त रहात होता.

तो पुणे येथील खडकी परिसरातील सेंट्रल गव्हन्मेंटच्या दारुगोळा बनवणाऱ्या विभागात नोकरीस होता. जामखेड येथे दिपकच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तो गावी आला होता. काल रविवारी सुट्टी संपल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी हजर रहाण्यासाठी तो रात्री उशिरा जामखेड येथून खाजगी ट्रॅव्हल गाडीने पुणे येथे चालला होता.

गाडीत जागा नसल्याने तो पुढे ड्रायव्हरच्या बाजुच्या कॅबिनमध्ये बसला होता. सदरची ट्रॅव्हल्स नगर -जामखेड रस्ता खराब असल्याने माहिजळगाव मार्गे पुणे येथे चालली होती. रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रॅव्हल्सची समोर चाललेल्या ट्रकला क्लिनर साईडच्या बाजुने जोराची धडक बसली.

या अपघातात कॅबिनमध्ये बसलेला दिपक पवार हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दिपक पवार याच्यावर जामखेड येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे एक लहान मुलगा, पत्नी व आई-वडील, असा परिवार आहे. दिपक याच्या आपघातती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe