Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघाताच्या घटनांची मालिका सुरु आहे. आता एक महिला चिरडून ठार झाल्याची घटना घडली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील बस स्थानकाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ढंपरच्या चाकाखाली येऊन झालेल्या गंभीर अपघातात ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रेखा राजेंद्र गायकवाड वय ४० रा.दौंड असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात प्रथम खबर देण्यात आली. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार दि.२८ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दौंडकडून नगरकडे रेखा राजेंद्र गायकवाड या मुलगा रवींद्र राजेंद्र गायकवाड यांच्या सोबत दुचाकीवरून जात
असताना घारगाव परिसरात नातेवाईकांचा फोन आल्याने त्यांना भेटण्यासाठी घारगाव येथे माघारी जात असताना दुचाकीवरील तोल सुटल्याने त्या रस्त्यावर पडल्या त्याच वेळी पाठीमागून नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खडीच्या ढंपरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने रेखा राजेंद्र गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.