Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात २५० बिबटे, आमदारांच्या वडिलांची थेट अजितदादांकडे धाव

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची वसाहत वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सुमारे २०० ते २५० बिबटे सद्यस्थितीत अस्तित्वात असून त्यामुळे मानवाला धोका निर्माण झालेला आहे.

तातडीने या बिबटयांचे निर्बिजीकरण करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात प्रसाद तनपुरे यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत राहुरी तालुक्यात २५० हून अधिक बिबटे अस्तित्वात आहेत.

एक मादी बिबटा एका वर्षामध्ये किमान ३ पिल्लांना जन्म देत असल्याने बिबट्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबटयांकडून मानवांवर तसेच पशुधनावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना सतत घडत आहेत.

यामध्ये मानव आणि पशुधनाची आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये बिबटयांमध्ये मानवी मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. शिवाय मानवी हानीमुळे परिणामी वन विभागास नुकसानीपोटी लक्षावधी रूपयांची आर्थिक मदत संबंधितांना द्यावी लागत आहे.

यासाठी आता तालुक्यातील बिबट्या प्रवण क्षेत्र निश्चित करणे तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच बिबटयांचे निर्बिजीकरण करून त्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि बिबट्यांचे अन्य भागात स्थलांतरण करणे आवश्यक आहे.

जुन्नर तालुक्यातील बिबट्या प्रणव क्षेत्रामध्ये आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ज्या पद्धतीने आदेश देण्यात आले आहेत तशाच उपाययोजना राहुरी तालुक्यातील बिबटयांबाबत करण्यात याव्या, अशी मागणी प्रसाद तनपुरे यांनी अजितदादा पवार यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मानवांवर हल्ले देखील झाले आहेत. पशुधनाचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News