Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडला. दरम्यान काही ठिकाणी वीज कोसळण्याची दुर्घटना देखील घडली. यात एका घटनेत कर्जत तालुक्यातील राशीन येथे शनिवारी सायंकाळी वीज कोसळून तीन जनावरे दगावली.
वादळी पावसाचा राशीनला जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राशीन येथील सुनील रामचंद्र आढाव यांच्या राहत्या घरातजवळ शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता वीज कोसळली त्यामध्ये एक गिरगाय, बैल, कालवडींचा जागीच मृत्यू झाला. अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.

वीज पडल्यामुळे राशीन मधील ग्रामस्थांचे पंखे फिज इन्वर्टर यासह विद्युत उपकरणे जळाली. वादळी वाऱ्यामळे लिंबोणीचे झाडे उन्मळून पडली. संबंधित नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रशांत गोंडचर, इम्रान काझी आदींनी या नुकसानीचा पंचनामा केला आहे.
तसेच वादळी पावसामुळे राशीनचा वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीजवळ वीज कोसळल्याने वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम दिवसभर युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी माहिती सहायक अभियंता कुणाल देकाटे यांनी दिली. वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
तर दुसऱ्या घटनेत हिवरा या गावांमध्ये रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या विजेच्या कडाक्याने रामकिसन टकले या मेंढपाळांच्या तब्बल बारा मेंढ्या वीज पडून मृत्यू झाल्या आहेत. या मेंढपाळांचा तब्बल दोन लाखाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे,
तात्काळ पंचनामे करून या मेंढपाळाला आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी होत आहे, सदरील पंचनामे करून मेंढपाळांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी शारदा पांढरे यांनी केली आहे.