अहमदनगरमध्ये अपघात, दिंडीतील वारकऱ्यास उडवले, जागीच मृत्यू

अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडील-मुलीचा झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झालाय.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडील-मुलीचा झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झालाय.

या अपघातामध्ये दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी (दि. ५) इमामपूर शिवारात घडला. या अपघातात दिंडीतील वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील दिंडी इमामपूर येथे नाश्त्यासाठी थांबली होती. रस्ता ओलांडत असताना दिंडीतील वारकरी अशोक नामदेव चव्हाण (वय ५५, रा. चिंचखेड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने (नंबर माहित नाही) जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमनाथ रघुनाथ कर्डिले (रा. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांतर्फे घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली.

अधिक तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या महामार्गावर नुकतेच काही दिवसांपूर्वी वडील व मुलगी हे ऍडमिशनसाठी निघालेले असताना अपघात झाला होता. यात दुर्दैवाने पित्याचा मृत्यू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe