नगर महापालिका आयुक्तांवर 8 लाखाची लाच मागितल्याचा आरोप ! आयुक्त अन लिपिक फरार, आयुक्तांचे दालन पोलिसांच्या ताब्यात, नगरमध्ये एकच खळबळ

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. असं म्हणतात की, भ्रष्टाचार ही प्रशासन व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड आहे. जोपर्यंत ही कीड दूर होणार नाही तोपर्यंत देशाचा एकात्मिक विकास होणे ही मोठी दुरापस्त गोष्ट आहे. यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासन आपल्या स्तरावर विविध प्रयत्न करते. भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा हीच सर्वसामान्यांची इच्छा देखील आहे.

मात्र, शासन जेवढा दावा करते तेवढे काम प्रत्यक्षात होत नाही. कारण की आजही भारतात भ्रष्टाचार होतो. अगदी गाव खेड्यापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत भ्रष्टाचाराचे लोन पसरलेले आहे. दरम्यान भ्रष्टाचाराची अशीच एक घटना समोर आली आहे ती अहमदनगर मधून. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर महापालिका आयुक्तांनी स्वतः बांधकाम परवाना देण्याच्या बदल्यात लाच मागितली आहे.

आयुक्तांनी लाखो रुपयांची लाच मागितली असून या प्रकरणात नगर महापालिका आयुक्तांवर एसीबीने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयुक्त पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजी नगर ( पूर्वीचे औरंगाबाद ) लाचलुचपत विरोधी विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे.

आयुक्तांवर आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाचलुचपत विरोधी विभागाच्या माध्यमातून आयुक्तालयातील क्लर्क आणि आयुक्त यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज अर्थातच 27 जून 2024 ला दुपारी आयुक्तांचे दालन अचानकपणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

याशिवाय एसीबीने आयुक्तांचे घरही सील करण्यात आले आहे. आयुक्तांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई सुरु असतानाच नगरचे आयुक्त आणि क्लर्क हे नॉट रीचेबल असल्याचे कळत आहे.

आयुक्त आणि क्लर्क दोन्हीही पसार झाले असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नगर चर्चेत आले आहे एवढे नक्की. अशा परिस्थितीत, आता आपण नेमके हे प्रकरण काय आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

काय होते प्रकरण ?

अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या एका बांधकामासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. हि लाच पालिकेचे लिपिक शेखर देशपांडे यांच्या माध्यमातून मागितली गेली होती असा आरोप आहे.

दरम्यान, याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाली. त्यानंतर मग एसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. विशेष म्हणजे तेव्हापासून महापालिका आयुक्त आणि लिपिक फरार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणात एसीबीने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe