Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ शाळांतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचेही इतर शाळेत समायोजन

Pragati
Published:
shikshak

Ahmednagar News : इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पट कमी होताना दिसतोय. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी कागदोपत्री पट अधिक असल्याचे काही शाळांनी दाखवले असल्याचे प्रकरणे देखील समोर आलेली होती. दरम्यान आता पारनेर तालुक्यातील पाचपेक्षा कमी पट असलेल्या सात शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी दयानंद पवार व गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असा शाळा तपासणीसाठीचा संयुक्त दौरा केला. त्या वेळी पाचपेक्षा कमी पट आढळून आलेल्या शाळामधील विद्यार्थी व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी समायोजन करण्याचे ठरविण्यात आले.

असे असले तरीही तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये मात्र प्रवेश शाळा खोल्या व शिक्षकांची कमी असलेली संख्या विचारात घेता त्यांना विद्यार्थ्यांसाठीचा प्रवेश बंद करावा लागला आहे. तालुक्यातील पाच विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सात शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना नजीकच्या एक किलोमीटर अंतरावरील सोयीच्या शाळेत समायोजन करण्यात करण्यात आले आहे.

या शाळेत एखाद्या इयत्तेत विद्यार्थीच नाहीत, तर काही इयत्तेत एक किंवा दोन विद्यार्थी आढळून आल्याने त्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना समायोजन करण्यात आले आहेत.

समायोजन करण्यात आलेले शिक्षक व शाळा पुढीलप्रमाणे : पिंपरी पठार, वडझिरे येथील लंकेवाडी, राळेगणसिद्धी केंद्रातील गणेशनगर व सावंत व शिर्के वस्ती, पुणेवाडी फाटा, बहिरोबावाडी, पिंपळगाव रोठा येथील जगताप वस्ती. गणेशनगर व ब्राह्मण दरा येथे, तर विद्यार्थीच नसल्याने त्याही ठिकाणचे शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe