Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत

Published on -

Ahmednagar News : मागील पाच दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील एक विषय चर्चेचा झाला होता. तो म्हणजे अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे यनाचे धरणातील बुडणे.

हे पाच दिवसांपूर्वी मासेमारी करायला गेल्यानंतर पाण्यात बुडाले होते. पाच दिवसानंतर पुण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला शनिवारी उशिरा त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.

अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील पोपट तुकाराम उघडे आपल्या नातेवाइकांसह येसरठाव धरणावर मासेमारीसाठी गेले असता, पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला. पाच दिवस पोलिस, नातेवाईक, ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, खोल पाणी असल्याने तो सापडत नव्हता. त्यामुळे तर्क-वितर्क केले जात होते.

पोपट उघडे हा पाण्यात पोहण्यात अत्यंत तरबेज व संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असल्याने शंका निर्माण झाली होती. शनिवारी उशिरा कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिस महसूल, आणि बचाव पथकांशी त्यांनी संपर्क ठेवून पाठपुरावा केला. पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोडे, ठाणे अंमलदार अनिल जाधव पाच दिवसांपासून घटनास्थळी होते.

मृतदेह शाबूत
पाणी खोल आणि थंड असल्याने पाच दिवसांनंतर मृतदेह अगदी सुस्थितीत होता, तर धरणात असलेल्या गाळात पाय रुतल्याने अट्टल पोहणारा असूनही पाण्याने बळी घेतला. मृतदेह गाळात पाय आणि पोहण्यासाठी फैलावलेले हात अशा अवस्थेत होता. धरणात खेकडे मासे मोठ्या प्रमाणात असूनही मृतदेह शाबूत होता अशी माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News