अहमदनगरच विभाजन आणि श्रीरामांच्या नावाने नवीन जिल्हा ! नेमके काय आहे प्लॅनिंग? पहा.. 

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी मंत्री गिरीश महाजन धावून आले असून श्रीरामपूरलाच जिल्हा करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर हाच जिल्हा होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

Updated on -

Ahmednagar News : श्रीरामपूर जिल्ह्यासाठी मंत्री गिरीश महाजन धावून आले असून श्रीरामपूरलाच जिल्हा करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर हाच जिल्हा होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

श्रीरामपूरकरांची जिल्हा मुख्यालयाची मागणी आहे. भौगोलिकृष्ट्या श्रीरामपूर हे योग्य आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडून कॅबिनेटसमोर हा विषय नेणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हे पण वाचा : अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! जिल्हा विभाजन होणारच…भाजपच्या मोठ्या नेत्याने…

येथील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात भाजप नेते प्रकाश चित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. विशेष विमानाने ते कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजपचे अनेक आजी माजी आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र महाराज उपाध्ये यांनी श्रीरामांच्या नावाने शहर वसविले. या शहराला प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे श्रीरामांच्या नावाने जिल्हा मुख्यालय झाल्यास तो एकमेव जिल्हा ठरेल.

हाच धागा पकडत मंत्री महाजन यांनीही चित्ते यांच्या भूमिकेला समर्थन दिले. श्रीरामपूर मुख्यालयासाठी योग्य ठिकाण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे यावर चर्चा करणार आहे.

प्रसंगी कॅबिनेटसमोर यावर जाहीर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरामपूरच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत स्वतः लक्ष देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे आमदार कानडे यांनीही घेतली महाजन यांची भेट
काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली. यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे कक्षा बाहेर होते.

असे असले तरी त्यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे हे मात्र उपस्थित होते, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याबाबत आमदार कानडे महणाले,

आपल्या तालुक्यात कोणीही मंत्री आले तरी लोकप्रतिनिधी म्हणून पाहुण्यांचे स्वागत करणे आपले कर्तब्य आहे. म्हणून आपणही स्वागत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe