अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी भरतीस अखेर मुहूर्त ! ‘असे’ असेल नवीन वेळापत्रक

गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला असून, राहिलेल्या अर्ध्या पदांच्या भरतीचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार १८ ते ३० जुलै यादरम्यान ही परीक्षा होत आहे. यात मुख्य सेविका, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक, कंत्राटी ग्रामसेवक या पदांसाठी परीक्षा होणार आहे.

Pragati
Published:
zp

Ahmednagar News : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद नोकर भरतीला अखेर मुहूर्त लागला असून, राहिलेल्या अर्ध्या पदांच्या भरतीचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार १८ ते ३० जुलै यादरम्यान ही परीक्षा होत आहे. यात मुख्य सेविका, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक, कंत्राटी ग्रामसेवक या पदांसाठी परीक्षा होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सरळसेवा कोट्यातून भरती घोषित केली. त्यानुसार नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती होत आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात ५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केली होती.

यात जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील ९३७ पदे भरण्यात येणार होते. त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. जिल्ह्यातून ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले.

अर्ज भरल्यानंतर दोन महिन्यांनी ३ ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. परंतु, यात १९ पैकी ११ संवर्गाची परीक्षा कशीबशी डिसेंबर २०२३ पर्यंत झाली. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरूष ५० टक्के हंगामी फवारणी),

आरोग्य सेवक (पुरूष इतर ४० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक आदींचे वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर होत नव्हते. अखेर आता ते जाहीर झाले आहे.

संवर्ग                                           पदसंख्या                    वेळापत्रक
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका                   ६                            १८ जुलै २०२४
आरोग्य परिचारिका                          ४९६                        १९ जुलै २०२४
आरोग्य सेवक (पुरुष ४० टक्के)          २२                           २२ व २३ जुलै २०२४
आरोग्य सेवक (पुरुष ५० टक्के)          १८७                         २३ व २४ जुलै २०२४
कंत्राटी ग्रामसेवक                             ५२                          २५,२९ व ३० जुलै २०२४

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe