Ahmednagar News : माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यावर कोयता, टिकावाने हल्ला ! अहमदनगरमधील ‘या’ गावात घडली घटना

Published on -

Ahmednagar News :  ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंचास कोयता, टिकावाने मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. आर्थिक व्यवहारातून झालेला वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या कारणातून त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे.

शिवाजी ज्ञानदेव चोरमले असे मारहाण झाल्याचे नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच आहेत. अधिक माहिती अशी : शिवाजी चोरमले हे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या काही मित्रांसह काष्टी येथे गेले होते.

तेथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी चोरमले यांचे मित्र सचिन कुटे यांच्यासोबत आर्थिकव्यवहारावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी चोरमले व त्यांच्या मित्रांनी हे भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

याचाच राग आरोपींना आला. यावेळी आरोपी शिंदे याने राहुल चोरमले यांना मारहाण केली. त्यानंतर शिंदे व त्याच्या दोन साथीदारांनी आम्ही कोण आहेत हे तुम्हाला दाखवतो असा दम देत निघून गेले. त्यानंतर काही वेळाने शिंदे यांच्यासह अनोळखी व्यक्ती हातात लाकडी काठ्या,

लोखंडी कोयता, चाकू टिकावं आदी हत्यारे घेऊन तेथे आले व त्यांनी शिवाजी चोरमले व त्यांच्या साथीदारांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. हातातील लोखंडी कोयता, टिकावाने मारहाण केल्याने व कोयत्याने वार झाल्यामुळे चोरमले व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सूत्रधार शिंदे (रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर), गणेश दत्तात्रय मचाले (रा. इनामगाव, ता. शिरूर), राहल लहू महारनोर (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा) आदींसह अनोळखी ७ ते ८ इसमांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!