Ahmednagar News : जामखेडची केळी थेट इराणला ! तरुणाची कमाल, केळी शेतीतून कमावले लाखो

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करायला लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात प्रयोगशील पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न काढल्याचे उदाहरणे आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
banaana

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करायला लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात प्रयोगशील पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न काढल्याचे उदाहरणे आहेत.

अगदी अकोल्यातील काळा गहू असेल किंवा थेट संगमनेरमधील सफरचंद शेती असेल. अगदीच केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली बोटा शिवारातील लामखडे या बंधूंनी केलेली लाखो रुपयांचं उत्पन्न देणारी डाळिंब शेती असेल.

ही सर्व उदाहरणे अहमदनरमधील प्रगतशील युवा शेतकऱ्यांचे. आता याच अनुशंघाने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका शेतकऱ्याचा केली पिकाचा प्रयोग समोर आला आहे.  जामखेड तालुक्यातील नायगाव येथील एका तरुण शेतकऱ्याची केळी इराणला निर्यात झाली आहे.

या तरुणाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून केळीची फळबाग फुलविली आहे. पहिल्या टप्प्यात नऊ टन केळी इराणला गेली असून त्यातून १ लाख ६२ हजार रुपये मिळाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गणेश उगले असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

येथील शेतकरी नेहमीच शेतीत विविध प्रयोग राबविण्यात अग्रेसर असतात. असाच फळबागेचा यशस्वी प्रयोग उगले यांनी केला आणि थेट इराणला केळी पोहोचवल्या. त्यांना अठरा हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला आहे. योग्य व्यवस्थापन करत ही किमया केली आहे

अशी साधली किमया
गणेश यांनी ‘जैन जी ९’ या वाणाची केळी लागवड केली. ५ बाय ६ फूट अंतरावर ही लागवड करण्यात आली. त्यामुळे एका एकरात बाराशे केळी झाडे लावली. लागवडीनंतर अकरा महिन्यांनी फळ सुरू झाले. रोप, ड्रीप, औषधे, खते मजुरी, मशागत असा एकरी दीड लाख रुपये खर्च आला.

७० गुंठ्यांत केलेल्या केळी पिकातून दहा लाख रुपयांचे उत्पन्न निघणे अपेक्षित असल्याचे उगले याने सांगितले. दहा हजार रुपये टन कमीत कमी केळीला भाव मिळाला तर ही शेती परवडते.

अठरा हजार रुपये प्रतिटन भावाने इराणला केळीची निर्यात केली. यंदा एकरी २५ ते ३० टन केळी निघणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe