Ahmednagar News : राजकीय वादातुन कोणी वादग्रस्त पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करू नका. अन्यथा अशा प्रवृत्तींविरोधात कारवाई करू, तुम्ही कोणीही मध्ये येवु नका. असा इशारा शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी दिला.
लोकसभा निवडणूक निकालानंतर दोन समाजामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असल्याने पाथर्डी तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, या विषयावर तालुक्यातील काही गावांत बंदसुद्धा पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्यात शांतता बैठक आयोजित केली होती. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी समाजातील युवकांनी व राजकीय समर्थकांनी शांतता पाळावी. जो कोणी चुक करील त्याच्यावर पोलिस कडक करावाई करतील. त्याला कणीही पाठीशी घालु, नये असे आवाहन पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.

स्टेट्स ठेवण्यावरुन वाद होवुन दोन समाजात ताणाव निर्माण होण्याच्या घटना मागील आठवड्यात घडलेल्या आहेत. त्यातुन मोर्चे, बंद अशा घटनादेखील पाथर्डी, तिसगाव व खरवंडी येथे झाल्या. कोणीतरी समाजात किमंत नसणारा व्यक्ती स्टेटस ठेवतो, त्यावरुन समाजाला दोष देणे चांगले नाही. मग तो कोणताही समाज असो. सामाजिक तणाव शांतता भंग करणार ठरेल. यातुन वाद उभे राहुन पिढ्यान्पिढ्या एकत्र राहणारे लोक दुरावतील. अशी चूक कोणीही करु नये, असे आवाहन मराठा व वंजारी समाजाच्या वतीने एकत्रीत करण्यात आले आहे.
कोणी काही असा प्रकार केला तर पोलिस योग्य ती कारवाई करतील. कोणीही कायदा हातात घेवु नये. रस्त्यावर उतरुन उगाच वेगळी प्रथा पाडु नये. अशी समज कार्यकर्त्यांना देण्यात आली. यावेळी मराठा, वंजारी व इतर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.