शिर्डीच्या साई मंदिराबाबत मोठा निर्णय, आता होणार ‘असे’ काही

देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील चारही प्रवेशद्वार भाविकांना येण्या जाण्यासाठी खुले करुन द्यावे, अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली होती.

Pragati
Published:
shirdi

Ahmednagar News : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील चारही प्रवेशद्वार भाविकांना येण्या जाण्यासाठी खुले करुन द्यावे, अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते

तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली होती. याप्रश्नी संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता प्रवेशद्वार खुले केली जाणार आहेत. या निर्णयामु‌ळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण  निर्माण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातील श्री साईबाबांचे मंदिर परिसरातील चारही प्रवेशद्वारातून भाविकांना येण्या-जाण्याकरीता खुले करुन द्याव, या मागणीसाठी कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी साइंसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेतली.

यावेळी प्रवेशद्वारे खुली करण्याबाबत संस्थानची सकारात्मक भूमिका असल्याची ग्वाही गाडीलकर यांनी दिली. साईभक्तांना कोविडच्या कारणास्तव प्रतिबंध करण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतला होता.

गेली चार वर्षे साई मंदिर परिसरातील गुरुस्थान, नंदादीप, लेंडी बाग, श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री शनी मंदिर आदी ठिकाणी साईभक्तांना जाण्यासाठी एकतर दर्शन रांगेतूनच समाधी मंदिरातून जावे लागते. त्यामुळे मोठा त्रास साईभक्तांना होत आहे. कोविडअगोदर साईभक्त, ग्रामस्थ या चारही प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात जाणे येणे सुरू असायचे.

त्यामुळे शहरातील चहुबाजूची बाजारपेठ कायम गर्दीने फुललेली दिसायची. तसेच शिडीं ग्रामस्थांना दैनंदिन पुजा अर्चा करण्यासाठी गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर , श्री शनी मंदिर आदी ठिकाणी जाता येत होते. प्रवेशद्वारे खुले करण्यात यावी, यासाठी मागील काळात कैलासबापू कोते यांनी ग्रामस्थांना बरोबर घेऊन पाठपुरावा केला होता.

तरीदेखील साई संस्थान प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याचा मोठ्या प्रमाणावर तोटा साई संस्थानबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील व्यवसायीकांना या चार वर्षांत सोसावा लागला. मंदीर परिसरात संस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या दानपेटीत गुप्त दान टाकण्यासाठी कोणत्याही प्रवेशद्वारातून भाविकाला मंदिर परिसरात जाता येत होते;

परंतु प्रवेशद्वार बंद तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गुरुस्थान, ध्यान मंदीर, शनी मंदिर, गणेश मंदिर, शिवमंदिर आदी ठिकाणी जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गुप्त दान करणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. प्रवेशद्वार बंद केल्याने येथील व्यवसायिक आर्थिक संकटाच्या खाईत सापडला आहे.

त्या अनुषंगाने साईभक्तांच्या श्रद्धा आणि भावनेचा विचार करता तसेच शहरातील व्यापारी, हात विक्रेते, गोरगरीबांना आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायतचे कैलासबापू कोते

तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या पुढाकाराने प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला संस्थानच्या वतीने हिरवा कंदील दाखवला असल्याचे कोते यांनी सांगितले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी किशोरशेठ गंगवाल यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.

येत्या दोन दिवसांत हॉटेल शांतीकमल येथे शहरातील व्यापारी वर्गाची चर्चासत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत व्यापाऱ्यांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचे कैलासबापू कोते व कमलाकर कोते यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe