Ahmednagar News : मोठा थरार ! नगर- मनमाड महामार्गावर धावत्या ट्रकमध्ये चालक पडला बेशुद्ध, त्यानंतर..

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : धावत्या ट्रकमध्ये चक्कर येऊन चालक बेशुद्ध झाला. क्लिनरने प्रसंगावधान दाखवून ट्रक रस्त्याच्या कडेला नेला. क्लिनरने स्टेअरिंग थोडे रस्त्याच्या बाजूने वळविले. चालक बलविंदरसिंग यांचा पाय नेमका ब्रेकवर पडला, अन…

मालवाहू ट्रक चालकाला भोवळ आल्याने नगर- मनमाड या महामार्गावरून जात असताना तालुक्यातील येसगाव शिवारात ट्रक रोडच्या कडेला काटवनात गेला. यावेळी मोठा अपघात होताना वाचला असून या घटनेतील वाहन चालकास दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

बलविंदरसिंग भगेल सिंग (वय ४९, रा. रोगला, जि. संगरूर, राज्य पंजाब) हे मंगळवारी (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याने ट्रक घेऊन जात होते. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात त्यांचा ट्रक असताना त्यांना अचानक चक्कर आली. क्लिनरने स्टेअरिंग थोडे रस्त्याच्या बाजूने वळविले.

चालक बलविंदरसिंग यांचा पाय नेमका ब्रेकवर पडला, त्यामुळे ट्रक थांबला. बलविंदरसिंग यांच्या तोंडाला फेस येऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, बलविंदरसिंग मांगेल (वय ४६) हा त्याची (पीबी १३ बीएस ८३९७) क्रमांकाच्या ट्रक मध्ये लुधियाना वरून किराणा माल घेऊन जात असता मंगळवारी रात्री उशिरा कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावर ट्रक चालकास भोवळ आली व त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला खाली काटवनात गेली.

तेव्हा त्यांच्या सोबतीला असलेल्या मदतनीसाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. याबाबत क्लिनर सनी सोनू चंडाल (वय १८, रा. पातरा, जि. पटियाला, राज्य, पंजाब) याने पोलिसांना खबर दिली. त्यावरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. एन. एस. शेख करीत आहेत.

या रस्त्यांवरून दिवस रात्र जड वाहतुक चालू असते. परंतु प्रसंगावधान राखून क्लिनरने गाडी थांबवली, अन्यथा मोठा प्रसंग ओढवला असता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe