कोट्यवधींचे व्यवहार संशयास्पद ! नगर अर्बन प्रकरणी डॉ. नीलेश शेळकेला कुणाचा वरदहस्त? पहा..

नगर अर्बन बँकेतील २५१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी थकीत कर्जदार डॉ. नीलेश शेळके याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Pragati
Published:
nilesh

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील २५१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी थकीत कर्जदार डॉ. नीलेश शेळके याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्यामुळंआता त्यांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळाप्रकरणी शेळके याला सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालय आवारातून ताब्यात घेतले होते. डॉ. नीलेश शेळके याच्या बँक खात्यात कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत.

याबाबत पोलिसांना तपास करायचा आहे. ही फसवणूक करताना आरोपीला आणखी कुणी मदत केली, याबाबत चौकशी केली जाणार आहे. आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात ८५ आरोपी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहेत. घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे.

पोलिसांनी यापूर्वी १२ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना जामीन मिळालेला नाही. या प्रकरणात पोलिसांनी ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार कारवाई केली आहे. ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. याप्रकरणात सुमारे ८५ आरोपी आहेत. अनेक आरोपी फरार असून, त्यांना अद्याप अटक नाही.

तपासी अधिकाऱ्यांनी काय केली मागणी ?
नगर अर्बन बँक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर सुमारे २५१ कोटींचा घोटाळा असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सहकार कायद्यानुसार वाढीव कलमे लावण्यात आली. आजतगायत बँकेच्या माजी अध्यक्ष, संचालकांसह मुख्य अधिकारी अशा १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात थकीत कर्जदार डॉ. नीलेश शेळके नाव निष्पन्न झाले होते. अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

त्याने बँकेतून दहा लाखांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते. त्यासाठी न वापरता अन्य कारणासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. असा विविध तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe